अभिनेता ऋषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट ‘कांतारा’ बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे. या चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून या चित्रपटाला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देऊ लागले आहेत. हिंदी आणि इतर भाषेमध्ये देखील हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कन्नडनंतर हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसातच बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे.
या चित्रपटाने अमेरिकेच्या बॉक्स ऑफिसवर डॉलरमध्ये 1 मिलियन कमावले आहेत. अमेरिका बॉक्स ऑफिसवर 1 मिलियन डॉलर कमावणारा कांतारा चित्रपट कन्नड भाषेतील दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाला मिलियन क्लबमध्ये प्रवेश मिळाला आहे. यापूर्वी ‘KGF 2’ ने देखील अमेरिकेत 1 मिलियन डॉलर कमावले होते.