देशात 5g ची सेवा सुरू झाली आहे. जिओ आणि एअरटेलने देशातील काही शहरांमध्ये फाईव्ह जी नेटवर्कला सुरुवात केली आहे. दरम्यान आता पुण्यात ही सेवा मिळू शकणार आहे.
एअरटेलने फाईव्ह जी सेवा सुरू करून पुणेकरांना नव्या वर्षाचे गिफ्ट दिले आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड, स्वारगेट, बाणेर, कल्याण नगर, हिंजेवाडी, खराडी, मॉडेल कॉलनी, मगरपट्टी येथे 5g सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील इतर भागात ही सेवा लवकरच सुरू होईल, असा दावा एअरटेल कंपनीने केला आहे. फाईव्ह जीचा लाभ घेण्यासाठी पुणेकरांना अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण फोरजी प्लॅनमध्येच रिटेल फाईव जी प्लसचा लाभ घेऊ शकता.