उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडून बंधारे ,तलाव भरुन मिळावेत; ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची आग्रही मागणी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला:- सांगोला तालुक्यामध्ये सध्या शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवत आहे. तसेच दुष्काळामुळे तालुक्याच्या विविध भागात शेतकर्‍यांची हाता-तोंडाशी आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडून बंधारे, तलाव भरुन मिळावेत,अशी आग्रही मागणी केली. याबाबतचे निवेदनही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.

यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असुन पाण्याची पातळी खालावलेली आहे. नदी,तलाव, बंधारे, ओढे, नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या मतदारसंघातील पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकर्‍यांनी केलेली असून काही ठिकाणी पाण्याआभावी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे.

तरी तालुक्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू तसेच म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करून माण व कोरडा नदी वरील सर्व बंधारे लवकरात लवकर भरून द्यावेत. त्याचबरोबर सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील बरेचसे क्षेत्र नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रा मध्ये येते. सद्य स्थितीमध्ये लाभक्षेत्रा मध्ये उन्हाची त्रीवता वाढली असल्याने पिकांना तातडीने पाण्याची आवश्यकता भासत असून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असुन पाण्याची पातळी खालावलेली आहे. तरी नीरा उजवा कालव्याचे सन 2024-2025 चे उन्हाळी आवर्तन तातडीने सुरु करावे तसेच सोनके तलाव लवकरात लवकर भरून देण्यात यावा आणि म्हसवड ( राजेवाडी ) या मध्यम प्रकल्प योजनेतून कटफळ तलावात पाणी सोडण्यात येवून आगामी उन्हाळी आवर्तन मिळावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली. सांगोला तालुक्यातील पिकांना आता पाण्याची आवश्यकता असून, यासाठी उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याकडे शेतकरी आस लावून बसला आहे. शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सांगोला विधानसभा क्षेत्रातील शेतकर्‍यांकडून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे करण्यात येत होती.

शेतकरी बांधवांकडून करण्यात आलेल्या मागणीची त्वरित दखल घेत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तातडीने पाणी सोडून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी विनंती केली.

लवकरच उन्हाळी आवर्तनाचे पाणी मिळणार

मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मकता दर्शवत लवकरात लवकर यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले असून नजीकच्या काळात पाणी सोडण्यात येणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.

 

इतर महत्वाच्या बातम्या

‘या’ 5 कारणांमुळे Samsung Galaxy S25 ठरतो तुमच्या स्वप्नातील फोन : पावर, परफॉर्मन्स आणि प्ले Galaxy S25 मध्ये आहे सर्वकाही!

60 दिवसांचा Airtel प्रीपेड प्लॅन, अहो दोन महिने रिचार्जचं नो टेन्शन, फायदे वाचा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, आज तुमच्या खात्यात…

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon