तुम्हाला सर्वात आळशी माणूस पहायचा असेल तर तुम्ही मातोश्रीवर जाऊ शकता, असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या एका वक्तव्यानंतर राणांनी हे प्रत्युत्तर दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर सुषमा अंधारे यांनी टीका केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना राणांनी, सर्वात आळशी माणूस पहायला तुम्ही मातोश्रीवर जाऊ शकता, या जहरी शब्दात टीका केली. नवनीत यांना अंधारे करत असलेल्या टीकेबद्दल विचारले असता, अंधारेंना ओळखत नसल्याचे त्या म्हणाल्या. एकतर मी त्यांना ओळखत नाही. ज्या पद्धतीने त्या टीका करत आहेत, ज्या पद्धतीने त्या अभिनय करत आहेत, ज्या पद्धतीने त्या मॅडम बोलत आहेत.
आळसी ऑफ द इयर पहायचा असेल तर मातोश्रीवर जा
त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मग फडणवीसांना सगळ्यात आळशी माणूस म्हटले. मला नवल वाटते. त्यांना जर आळशी माणूस शोधायचा आहे, तर ‘मातोश्री’मध्ये जाऊन शोधावा. तो आळशी माणूस त्यांना तिथे भेटेल, असेही राणा म्हणाल्या.
RELATED ARTICLES